Decent CSR

डिसेन्ट फौंडेशन हि एक सरकारमान्य संस्था आहे. हि संस्था शिक्षण, मुलांचे आरोग्य, शेतकरी आणि दिव्यांग लोकांच्या प्रगतीसाठी सामाजिक सुधारणा घडविण्यासाठी गेली ३ वर्षे कार्यरत आहे. किशोरवयीन मुलींचे शिक्षण, शाळांमध्ये स्वच्छतेचे महत्व, त्यांचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन, मोफत वि वाह आयोजन, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना पालकत्वाचे समर्थन आणि मोफत आरोग्य शिबीर यांसारखे महत्वपूर्ण कार्यक्रम डिसेंट फौंडेशन पार पाडत आले आहे.
१. कळी उमलताना
किशोरावस्था ही जितकी सुंदर तितकीच काहीशी अवघड अवस्था . या अवस्थेत मुलींच्या शरीरात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल व त्या संदर्भात असलेल्या समस्या , यासाठी डिसेंट फौंडेशनने कळी उमलताना हा उपक्रम सुरु केला. १० ते २० या वयो गटातील मुलींना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी , मानसिक तसेच शारिरीक आरोग्य इत्यादी समस्यां बाबत योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी दिले जाते. किशोरावस्थेत शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडत असतात. खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलींमध्ये या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे गैरसमज वाढतात. ‘कळी उमलताना’ या उपक्रमाद्वारे डिसेंट फौंडेशनचे चे सदस्य, अशा अनेक खेड्यांमधील किशोरवयीन मुलींना त्यांच्या शारिरीक आणि मानसिक बदलआणि मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करतात, सुमारे २५ डॉक्टरांची टीम मुलींशी या संदर्भात संवाद साधते ते, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. सॅनिनिटरी नॅपकिन व या अवस्थेसंबंधित उपयोगी असलेल्या या पुस्तकांचे मोफत वाटप देखील केले जाते. आजवर अनेक खेड्यांमध्ये सुमारे १२,००० मुलींना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलींचे जीवन सुरक्षित आणि निरोगी झाले आहे. निरोगी मुलगी म्हणजेच निरोगी राष्ट्र.

२. संस्कार स्वच्छतेचा
लहान वयात मुलांमधील होणाऱ्या संस्कारांमध्ये शाळांचाही प्रमुख वाटा असतो, म्हणूनच स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे महत्व आणि त्याच्या अभावामुळे होणाऱ्या समस्यांसंदर्भात मार्गदर्शन देण्याचा हा महत्वपूर्ण उपक्रम डिसेंट फौंडेशनने हाती घेतला. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील शाळा आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व बाबींचा समावेश असलेले स्वच्छता किट मोफत देण्यात येते. यामध्ये झाडू, छोटे-मोठे डस्टबिन, मॉप्स, क्लीनिंग केमिकल्स यांसारख्या २५ साहित्यांचा समावेश आहे. १०,००० किमतीचे एक किट, अशी १०० हुन अधिक किट्स उपक्रमाच्या पहिल्या टप्यात देण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्यात मुलांना घर, शाळा आणि परिसर स्वच्छतेचे प्रशिक्षण दिले जाते. स्वच्छता किटचा योग्य वापर आणि परिसर स्वच्छता यांचे निरीक्षण फौंडेशन सदस्य वेळोवेळी करतात. खेड्यापाड्यांतील मुलांना स्वच्छतेची सवय लावून त्यांचे जीवन स्वच्छ आणि सुंदर करणे हाच डिसेंट फौंडेशनचा उद्देश आहे.

३. शेतकरी जागृती कार्यक्रम
प्रगतशील देशाची ओळख म्हणजे प्रगत शेतकरी . शेतकरी हा रात्रंदिवस काबाडकष्ट करून उत्तम पीक काढतो, पण बहुतेक शेतकऱ्यांना रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा संभाव्य धोका माहित नसतो. रासायनिक खतांमुळे पिकांचे जरी चांगले उत्पन्न येत असले तरी त्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत आणि जमिनीबरोबर शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक आहेत. डिसेंट फौंडेशनने याबाबत महत्वाचे पाऊल उचलले आहे. कीटकनाशकांचा, खतांचा योग्य वापर आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण दिले जाते. कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते आणि फवारणीची प्रात्यक्षिकही दिले जाते. डिसेंट फौंडेशन शेतकऱ्यांना सुरक्षित आणि निरोगी राहण्यासाठी मोफत संरक्षण उपकरणे देखील वितरित करतात.

४. एखाद्यासाठी निरुपयोगी तर दुसऱ्यासाठी उपयोगी
एखाद्यासाठी निरुपयोगी तर दुसऱ्यासाठी उपयोगी कपडे, जुनी पुस्तके, वह्या, पाण्याच्या बाटल्या, सायकल, दप्तर यांसारख्या वस्तू गरजू लोकांसाठी उपयोगी ठरू शकतात. यासारख्या सुसुस्थितीत असलेल्या वस्तू शहरी भागांतून गोळा करून खेड्या पाड्यांतील गरजू मुलांना वाटल्या जातात. म्हणजेच एखाद्यासाठी निरुपयोगी असलेली वस्तू दुसऱ्यासाठी उपयोगी ठरू शकते. या उपक्रमामुळे उत्पादनांचा पुनर्वापर होऊन मौल्यवान संसाधनांची बचत करण्यास मदत होते. अनेकदा आयोजित केलेल्या कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

५. इतर उपक्रम फौंडेशन
इतर उपक्रमांबरोबर मोफत सामुदायिक विवाह आयोजित केले जातात. तसेच सामाजिक पालकत्व स्विकारुन गरीब मुलांना दत्तक घेऊन आर्थिक मदत केली जाते. गावांमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. भविष्यात ही कामे अशीच कार्यरत ठेवण्याचा फौंडेशनचा प्रयत्न असेल आणि गरजुंना सुरक्षित आणि सुखी बनवणे हाच उद्देश असेल.

Banking Details for Donation:
Merchant Name: Decent Foundation
Bank: Kotak Mahindra Bank
A/C No. 2513281471
IFSC: KKBK0001772

Choose Your Color
You can easily change and switch the colors.