डिसेन्ट फौंडेशन हि एक सरकारमान्य संस्था आहे. हि संस्था शिक्षण, मुलांचे आरोग्य, शेतकरी आणि दिव्यांग लोकांच्या प्रगतीसाठी सामाजिक सुधारणा घडविण्यासाठी गेली ३ वर्षे कार्यरत आहे.
किशोरवयीन मुलींचे शिक्षण, शाळांमध्ये स्वच्छतेचे महत्व, त्यांचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन, मोफत वि वाह आयोजन, आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना पालकत्वाचे समर्थन आणि मोफत आरोग्य शिबीर यांसारखे महत्वपूर्ण कार्यक्रम
डिसेंट फौंडेशन पार पाडत आले आहे.
१. कळी उमलताना
किशोरावस्था ही जितकी सुंदर तितकीच काहीशी अवघड अवस्था . या अवस्थेत मुलींच्या शरीरात होणारे मानसिक आणि शारीरिक बदल व त्या संदर्भात असलेल्या समस्या , यासाठी डिसेंट फौंडेशनने कळी उमलताना हा उपक्रम सुरु केला. १० ते २० या वयो गटातील मुलींना वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळी , मानसिक तसेच शारिरीक आरोग्य इत्यादी समस्यां बाबत योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी दिले जाते. किशोरावस्थेत शरीरात अनेक हॉर्मोनल बदल घडत असतात. खेड्यापाड्यात राहणाऱ्या मुलींमध्ये या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन नसल्यामुळे गैरसमज वाढतात.
‘कळी उमलताना’ या उपक्रमाद्वारे डिसेंट फौंडेशनचे चे सदस्य, अशा अनेक खेड्यांमधील किशोरवयीन मुलींना त्यांच्या शारिरीक आणि मानसिक बदलआणि मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करतात, सुमारे २५ डॉक्टरांची टीम मुलींशी या संदर्भात संवाद साधते ते, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. सॅनिनिटरी नॅपकिन व या अवस्थेसंबंधित उपयोगी असलेल्या या पुस्तकांचे मोफत वाटप देखील केले जाते. आजवर अनेक खेड्यांमध्ये सुमारे १२,००० मुलींना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. या उपक्रमामुळे अनेक मुलींचे जीवन सुरक्षित आणि निरोगी झाले आहे. निरोगी मुलगी म्हणजेच निरोगी राष्ट्र.